पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यूझीलंड संघ सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी – २० सामने खेळेल. किवी संघ १८ वर्षानंतर पाकिस्तानात येत आहे. २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. पण आता हळूहळू सर्व मोठे संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. परंतू पाकिस्ताने IPL 2021 ला धक्का दिला आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की न्यूझीलंडचे किती खेळाडू IPL मध्ये भाग घेतील. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेले वेळापत्रक आणि IPL च्या वेळापत्रांमधील ताखांमध्ये टक्कर होत आहे.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. IPL-14 चा दुसरा भाग यूएईमध्ये १९  सप्टेंबरपासून खेळला जाईल आणि अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होईल. या २७ दिवसांमध्ये एकूण ३१ सामने खेळले जातील.

तारखांमध्ये टक्कर

हे स्पष्ट आहे की आयपीएल आणि न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तारखांमध्ये टक्कर होत आहे. आयपीएल फ्रँचायझीमध्ये न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सामील आहेत, विशेषतः एसआरएचचे केन विल्यमसन, एमआयचे ट्रेंट बोल्ट आणि केकेआरचे लॉकी फर्ग्युसन, अशा स्थितीत या खेळाडूंना हा दौरा करण्यात अडचण येऊ शकते पण न्यूझीलंड क्रिकेट प्रमुख डेव्हिड व्हाइट यांनी या दौऱ्यातून ज्यांना दिलासा दिला आहे त्यांची नावे स्पष्ट केली आहेत.

“न्यूझीलंडचे कर्णधार केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम आणि लॉकी फर्ग्यूसन आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तान मालिकेऐवजी यूएईमध्ये सहभागी होतील,” जिओ टीव्हीने न्यूझीलंड क्रिकेट प्रमुख डेव्हिड व्हाईटच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा – Ind vs Eng : …अन् विराट कोहली मैदानातच ऋषभ पंतच्या पाया पडला

आयपीएल २०२१ मध्ये खेळणारे न्यूझीलंडचे खेळाडू 

केन विल्यमसन (SRH), अॅडम मिल्ने (MI) ट्रेंट बोल्ट (MI), मिशेल सॅन्टनर (CSK), लॉकी फर्ग्यूसन (KKR), टीम सेफर्ट (KKR), फिन एलन (RCB), केली जेमीसन (RCB)

या दौऱ्याबाबत पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “न्यूझीलंडसारख्या अव्वल क्रमांकाच्या संघाविरुद्ध मालिका खेळणे ही अत्यंत रोमांचक असेल. हा संघ २०१९ चा विश्वचषक विजेता आहे, विश्व कसोटी चॅम्पियन आणि टी-२० क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे  स्थानिक चाहत्यांना प्रचंड आकर्षण आहे. आम्ही यशस्वी आयोजनासह पाकिस्तानला सुरक्षित देश म्हणून पुन्हा स्थापित करू.”