News Flash

IPL 2021: पंजाबच्या दीपक हुड्डाची वेगवान अर्धशतकी खेळी

दीपक हुड्डाच्या फलंदाजीतून चौकार, षटकारांचा पाऊस

आयपीएल म्हटलं चौकार षटकारांचा पाऊस…फलंदाज गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडतात. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. पंजाबच्या दीपक हुड्डाने यंदाच्या आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकावलं.

पंजाबच्या दीपक हुड्डाने अवघ्या २० चेंडुत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात हुड्डाने २८ चेंडुंचा सामना करत ६४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. ख्रिस मॉरिसच्या चेंडुवर उंच फटका मारण्याच्या नादात रियान परागच्या हाती झेल देऊन बाद झाला. विशेष म्हणजे कर्णधार केएल राहुलसोबत त्याने २२ चेंडुत अर्धशतकी भागिदारी केली. त्याच्या आक्रमक खेळीनंतर पंजाब किंग्सने मजेशीर ट्वीट केलं आहे. ‘केएल: वानखेडे का गुंडा हू मै…..हुड्डा: मै भी’ असं कॅप्शन देत फोटो ट्वीट केला आहे.

पंजाबचा कर्णधार केएल राहुल यानेही या सामन्यात चांगली खेळी केली. ५० चेंडुत ९१ धावांची खेळी केली. त्यात ५ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याचं शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं. चेतनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना सीमेवर राहुल तेवतियाने त्याचा झेल घेतला.

हुड्डा आणि केएल राहुलच्या दमदार खेळीमुळे पंजाबने ६ गडी गमवत २२१ धावांचा डोंगर रचला. या मोठ्या धावसंख्येमुळे पंजाबच्या गोलंदाजांवरील दडपण काही का होईना थोडं कमी झालं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 9:49 pm

Web Title: ipl 2021 punjab deepak hooda makes fastest half century in 20 ball rmt
Next Stories
1 IPL 2021: ट्रक चालकाचा पोरगा ते राजस्थानकडून आयपीएल खेळणारा गोलंदाज
2 शिखर धवनच्या ‘गब्बर डान्स’ची सोशल मीडियावर धूम
3 दिनेश कार्तिक नव्या इनिंगसाठी सज्ज; ‘या’ भूमिकेत दिसणार
Just Now!
X