पंजाब किंग्ज

* कर्णधार : के. एल. राहुल

* सर्वोत्तम कामगिरी  : उपविजेतेपद (२०१४)

* मुख्य आकर्षण : शाहरुख खान

आठ संघांपैकी अनिल कुंबळेच्या रुपात एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक असणारा संघ म्हणजे पंजाब किंग्ज. संघाच्या नावात आणि जर्सीत बदल केलेल्या पंजाबचे यंदा भाग्यही पालटणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कर्णधार के. एल. राहुलसह, मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन असे धडाकेबाज फलंदाज पंजाबकडे असून ट्वेन्टी-२० प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज मानल्या जाणाऱ्या डेव्हिड मलानच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. विजय हजारे आणि मुश्ताक अली स्पर्धेत तुफान फटकेबाजी करणारा तमिळनाडूचा शाहरुख खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. गोलंदाजीत मोहम्मद शमीवर अतिरिक्त दडपण येऊ नये यासाठी रवी बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन यांना कामगिरी उंचवावी लागणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावेळीही तळातील चार संघांमध्येच पंजाबचे नाव दिसून येईल.

संघ : के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, डेव्हिड मलान, सर्फराज खान, निकोलस पूरन, दीपक हूडा, मंदीप सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, मोझेस हेन्रिक्स, इशान पोरेल, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, रायले मेरिडिथ, दर्शन नळकांडे, शाहरुख खान, उत्कर्ष सिंग, फॅबिअन अ‍ॅलेन, मुरुगन अश्विन, प्रभसिमरन सिंग, सौरभ कुमार, जलज सक्सेना. ल्ल मुख्य प्रशिक्षक : अनिल कुंबळे