News Flash

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका; आर अश्चिनचा घरी परतण्याचा निर्णय

आर अश्विनने ट्विट करत दिली माहिती

संग्रहित (PTI)

दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबाला करोनाची लागण झाली असल्याने आर अश्विनने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या हंगामातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर आर अश्विनने ट्विट करत ही माहिती दिली.

SRH vs DC : सुपर संडेला सुपर ओव्हरचा थरार!

“यावर्षीच्या आयपीएलमधून मी उद्यापासून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब करोनाविरोधात लढा देत आहे. या कठीण काळात मला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे,” असं अश्विनने ट्विटमध्ये सांगितलं आहे. आर अश्विनने यावेळी सर्व गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर आपण पुन्हा खेळण्यासाठी परत येऊ असं स्पष्ट केलं आहे.

आर अश्विनच्या निर्णयावर दिल्ली कॅपिटल्सनेही प्रतिक्रिया दिली असून त्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करत संकटाच्या या काळात आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, प्रज्ञान ओझा यांनीदेखील ट्विट करत आर अश्विनला पाठिंबा दर्शवत कुटुंबीयांची प्रकृती बरी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आर अश्विनने आपल्या १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ७७ कसोटी, १११ एकदिवसीय आणि ४६ टी-२० सामने खेळले आहेत. आर अश्विनच्या नावावर ४०६ विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त १६ गोलंदाजांनी हा रेकॉर्ड केला असून त्यामध्ये अश्विनचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 10:31 am

Web Title: ipl 2021 r ashwin pulls out of ipl to help family fight against covid 19 sgy 87
टॅग : Coronavirus,IPL 2021
Next Stories
1 SRH vs DC : सुपर संडेला सुपर ओव्हरचा थरार!
2 राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का; चौथ्या परदेशी खेळाडूनं सोडली साथ
3 “देवाला कळलं, की रजनीकांत म्हातारा झालाय म्हणून त्यानं…”, धोनीचं जुनं ट्विट चर्चेत