News Flash

क्या बात..! राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी चर्चेत

पाहा राजस्थान रॉयल्सच्या नव्या जर्सीचे फोटो

राजस्थान रॉयल्स

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही स्पर्धा भारतीयांसाठी उत्सवासारखी आहे. भारतीय लोक आयपीएलच्या या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. आयपीएल ही केवळ भारतच नाही, तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. यंदा आयपीएल 9 एप्रिलपासून होणार आहे. नव्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीत बदल केला. आता अजून एका संघाने आपली नवीन जर्सी समोर आणली आहे.

 

IPL 2021 rajasthan royals launched their new jersey राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी

 

आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्सने 3D प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून राजस्थानने ही जर्सी समोर आणली. राजस्थान रॉयल्सने 2008मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर राजस्थानची कामगिरी फारशी खास राहिली नाही. मागील वर्षी भन्नाट सुरुवात केल्यानंतर राजस्थान स्पर्धेच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करू शकला नाही.

 

राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला संघाचा कर्णधार केले आहे. श्रींलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचीही या मोसमात संघाच्या संचालकपदी निवड झाली आहे.

 

आयपीएल 2021च्या लिलावासाठी राजस्थानने सर्वात महागडी बोली लावली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींची बोली लावत संघात घेतले. शिवाय, संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे बांगलादेशच्या मुस्तफिजुरला मॉरिसची योग्य साथ मिळू शकते. मॉरिसपूर्वी, आयपीएलच्या इतिहासात युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला 16 कोटींची बोली लागली होती.

संघ

संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, केसी करीप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 4:04 pm

Web Title: ipl 2021 rajasthan royals launched their new jersey adn 96
टॅग : Rajasthan Royals
Next Stories
1 आयपीएलपूर्वी नेट्समध्ये धोनीचा धुमाकूळ…! पाहा व्हिडिओ
2 मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत नवाब मलिक म्हणाले…
3 VIDEO : रसेलच्या खतरनाक ‘शॉट’मुळे जमिनीवर कोसळला दिनेश कार्तिक!
Just Now!
X