राजस्थान रॉयल्स

* कर्णधार : संजू सॅमसन

* सर्वोत्तम कामगिरी  : विजेतेपद (२००८)

* मुख्य आकर्षण : ख्रिस मॉरिस

कोणच्याही खिजगणतीत नसलेल्या राजस्थान रॉयल्सने २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मिळवले. परंतु त्यानंतर गेली १२ वर्षे या संघाची गाडी रुळावरून घसरलेली पाहायलाच मिळते. त्यामुळे यंदा प्रथमच नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणारा संजू सॅमसन काय कमाल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसकडून राजस्थानला अष्टपैलू योगदानाची अपेक्षा आहे. जायबंदी जोफ्रा आर्चर सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार असल्याने राजस्थानपुढील आव्हानांत वाढ झाली आहे. बेन स्टोक्स, जोस बटलर या इंग्लिश जोडीवर राजस्थानची प्रामुख्याने भिस्त असून राहुल तेवतिया, यशस्वी जैस्वाल, रियान पराग अशा बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंमुळे त्यांना यावेळी बाद फेरी गाठण्याची आशा आहे. मात्र त्यासाठी संघातील खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी करणे गरजेचे आहे. अन्यथा २००८नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचे राजस्थानचे स्वप्न यंदाही उद्ध्वस्त होईल.

संघ : संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस मॉरिस, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, डेव्हिड मिलर, लिआम लिव्हिंगस्टोन, मुस्तफिजूर रहमान, अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, रियान पराग, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, मर्यांक मार्कंडे, मणिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, अनुज रावत, कुलदिप यादव, चेतन सकारिया, शिवम दुबे, केसी कॅरिअप्पा, मनन वोहरा.

* मुख्य प्रशिक्षक :अँड्र्यू मॅक्डोनाल्ड