आयपीएल स्पर्धेत बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला. या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. देवदत्तनं ५२ चेंडूत १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत ७२ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दूसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवदत्त पडिक्कलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक झळकावलं आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात तो झटपट बाद झाला होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १३ चेंडूत ११ धावा करु शकला होता. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शाहबाज नदीमनं त्याला झेल पकडून तंबूत पाठवलं होतं. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही २८ चेंडूत २५ धावा करू शकला. प्रसिध क्रिष्णाच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने त्याचा झेल घेतला. त्यामुळे गेल्या दोन सामन्यापासून तो खेळीच्या प्रतीक्षेत होता. अखेर राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसला आणि त्याने पहिलं शतक ठोकलं.

राजस्थानचा डाव

राजस्थानचे सुरुवातीला चार गडी झटपट बाद झाल्यानंतर संघ दडपणाखाली आला होता. पाचव्या गडीसाठी शिवम आणि रियान जोडीनं राजस्थानचा डाव सावरला. मात्र शिवम दुबे आणि रियान पराग जोडी फोडण्यात हर्षल पटेलला यश आलं आहे. तिथपर्यंत या जोडीनं राजस्थानचा डाव सावरला होता. मात्र चुकीचा फटका मारण्याच्या नादात रियान पराग युजर्वेंद्र चहलच्या हाती झेल देऊन बाद झाला. तर शिवम दुबे केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिवमने ३२ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. तर रियान पराग १६ चेंडूत २५ धावा करुन बाद झाला. त्यानंतर राहुल तेवतियाने चांगली खेली केली. त्याने २३ चेंडूत ४० धावांची खेळी केली. याआधी जोस बटलर, मनन वोहरा, डेविड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परतले होते. मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत ४ षटकात २७ धावा देत ३ गडी बाद केले. तर हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकात ४७ धावा देत ३ गडी बाद केले. सध्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केल्याने आता त्याचे एकूण १२ गडी झाले आहेत.

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  बंगळुरुची या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.

संघ

राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, मनन वोहरा, शिवम दुबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कायल जेमिसन, हर्षल पटेल,मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, युजर्वेंद्र चहल

 

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rcb vs rr match on wankhede stadium rmt
First published on: 22-04-2021 at 19:02 IST