आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला. देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे. या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत.

या सामन्यात देवदत्त पडिक्कलनं ५२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तर विराटने ४७ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.विराट कोहलीनं आयपीएलमधलं ४० वं अर्धशतक केलं. या अर्धशतकासंह त्याने आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहे. आयपीएलमध्ये इतकी धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज आहे.

IPL 2021: पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्माची खास रणनिती

बंगळुरुकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत ४ षटकात २७ धावा देत ३ गडी बाद केले. तर हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकात ४७ धावा देत ३ गडी बाद केले. सध्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केल्याने आता त्याचे एकूण १२ गडी झाले आहेत.

“बंगळुरु संघातील वातावरण एकदम घरच्यासारखं”; ग्लेन मॅक्सवेलनं व्यक्त केल्या भावना

राजस्थाननं हा सामना गमावल्यानं राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाब विरुद्धचा सामना राजस्थाननं ४ धावांनी गमावला होता. तर चेन्नईने ४५ धावांनी राजस्थानला पराभूत केलं होतं. दिल्ली विरुद्धचा सामना राजस्थाननं ३ गडी आणि दोन बॉल राखून जिंकला होता. आता राजस्थानचा पुढचा सामना कोलकातासोबत २४ एप्रिलला आहे.