पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या IPLच्या लिलावाआधी आज सर्वच संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. यात सर्वात धक्कादायक निर्णय ठरला तो राजस्थान रॉयल्सचा… त्यांनी त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकल्याचं सांगितलं. राजस्थानने अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली. त्यानंतर संघाचा कर्णधार कोण असेल अशी साऱ्यांनाच उत्सुकता होती. या चर्चांनाही राजस्थानकडून पूर्णविराम देण्यात आला.

राजस्थान संघ व्यवस्थापनाने स्मिथला करारमुक्त करण्याचा निर्णय खूप चर्चा करून घेतला. स्मिथने २०१४,२०१५, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं. मागील पर्वामध्ये राजस्थानचा संघ गुणतक्त्यात अगदी तळाशी राहिला. त्यानंतर राजस्थानकडून हा निर्णय आल्याचं सांगितलं जात आहे. आता राजस्थानच्या संघाची जबाबदारी युवा खेळाडू संजू सॅमसन याच्यावर असणार आहे. राजस्थानने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे स्पष्ट केलं आहे.

कायम राखलेले खेळाडू-

संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवातिया, रियान पराग, श्रेयस गोपाल, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, अँड्र्यू टाय

करारामुक्त केलेले खेळाडू-

स्टीव्ह स्मिथ, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी, अंकित राजपूत, ओशने थॉमस, शशांक सिंग, टॉम करन, वरुण आरोन