IPL 2020चं विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकलं. या हंगामात कोलकाताने पाचव्या स्थानी स्पर्धा संपवली. कोलकाताच्या संघाचे नेतृत्व सुरूवातीला दिनेश कार्तिकने केलं होतं. पण काही सामन्यांनंतर मात्र कार्तिकच्या जागी इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनने ही जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाचा भार आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबादारी कार्तिकला शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता IPL 2021 या स्पर्धेआधी कोलकाताने काही खेळाडूंना करारमुक्त केलं, तर काहींना संघात कायम राखलं. याच मुद्द्यावरून कोलकाता संघाने चेन्नईची खिल्ली उडवली.

‘जय मल्हार’मधल्या ‘बानू’च्या बोल्ड लूकची चर्चा… पाहा Photos

कोलकाताने संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या टीम सिफर्ट या क्रिकेटपटूचं नाव आहे. गेले काही दिवस टीम सिफर्ट प्रचंड लयीत फलंदाजी करताना दिसतो आहे. सिफर्टने न्यूझीलंडसाठी खेळलेल्या ३० टी-२० सामन्यांमध्ये १४०च्या स्ट्राईक रेटने आणि २८च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात ५ झंझावाती अर्धशतकांचाही समावेश आहे. २०२०च्या उत्तरार्धात सिफर्टने पाकिस्तानविरूद्ध धडाकेबाज फलंदाजी केली. सिफर्ट ३ सामन्यांच्या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. मालिकेत त्याने एकूण १७२ धावा केल्या होत्या. तर नाबाद ८९ ही त्याची सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या होती.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
supreme court orders cbi probe into mysterious death of manipuri woman in 2013
२०१३ च्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे
kolkata knight riders vs sunrisers hyderabad
IPL 2024 : कमिन्स विरुद्ध स्टार्क द्वंद्व; श्रेयसच्या नेतृत्वाखालील कोलकाताची आज हैदराबादशी गाठ

BCCI Time Trial Test: ‘यो-यो’नंतर आता खेळाडूंना द्यावी लागणार नवी टेस्ट; जाणून घ्या स्वरूप

सिफर्ट पाकिस्तानविरूद्ध फटकेबाजी करत असताना चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग समालोचन कक्षात होते. त्यावेळी त्याची फटकेबाजी बघून फ्लेमिंग म्हणाले होते की IPLमध्ये पिवळ्या रंगाची जर्सी सिफर्टची वाट पाहत आहेत. पण कोलकाताने सिफर्टला करारमुक्त केलेच नसल्याने फ्लेमिंग यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. त्यामुळे KKRने ट्विटरवर CSKला ट्रोल केलं.

KKRने कायम राखलेले खेळाडू-

इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुबमन गिल, रिंकू सिंग, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसल, सुनील नारायण, टिम सिफर्ट