News Flash

IPL 2021: ट्रक चालकाचा पोरगा ते राजस्थानकडून आयपीएल खेळणारा गोलंदाज

ट्रक ड्रायव्हरचा मुलगा ते राजस्थान रॉयल्सपर्यंतचा प्रवास

आयपीएल म्हणजे नवोदीत खेळाडुंसाठी काहीतरी करून दाखवण्याचं हक्काची स्पर्धा..निवड होण्यापासून ते संभाव्य ११ खेळाडुंमध्ये निवड होईपर्यंत धकधक असते. एकदा का ११ खेळाडुंमध्ये स्थान मिळालं की मग चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. राजस्थान रॉयल्सकडून संधी मिळालेल्या वेगवान गोलंदाज चेतन सकारिया यानंही तेच स्वप्न पाहिलं. पंजाब विरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दिसावा यासाठी तो पहिल्या चेंडुपासून प्रयत्न करत होता. त्याच्या प्रयत्नांना यशही आलं.

राजस्थानच्या चेतन सकारियाने आपल्या गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करत पंजाबचे ३ गडी बाद केले. आयपीएल कारकिर्दीतली त्याची पहिली आणि सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वात प्रथम १४ धावांवर खेळत असलेल्या मयंक अग्रवालला त्याने बाद केलं. अचूक टप्पा टाकत संजू सॅमसनच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. त्याला बाद केल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे सेट असलेल्या केएल राहुलला त्याने बाद केले. राहुल तेवतियाने सीमेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. तर चेतनने अखेरच्या चेंडुवर रिचर्डसनला बाद केलं. ४ षटकात ३१ धावा देत त्याने तीन गडी बाद केले. चेतनने क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर सकारियाने एक अप्रतिम झेलही टीपला. पंजाबच्या निकोलस पूरनचा त्याने उडी मारून झेल घेतला.

IPL 2021: फिट असूनही हार्दीक पंड्याने गोलंदाजी केली नाही!; झहीर खानने केला खुलासा

चेतनचा राजस्थान रॉयल्स संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही खडतर आहे. चेतनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. त्यानंतर ते गुजरातमध्ये टेम्पो चालवू लागले. तेव्हा चेतनकडे खेळण्यासाठी आवश्यक वस्तूही नव्हत्या, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने क्रिकेट शिकवण्याची फी सुद्धा घेतली नाही. त्यामुळे मी आता इथवर येऊन पोहोचलो, असंही तो सांगण्यास विसरला नाही.

शिखर धवनच्या ‘गब्बर डान्स’ची सोशल मीडियावर धूम

चेतनने २०१७-१८ सालच्या विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण केलं होतं. जडेजा फिट नसल्याने त्याला संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र जडेजाने त्याचं मनोबळ वाढवलं आणि पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरत दोन गडी बाद केले. चेतनने घरच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत १६ टी २० सामना खेळले आहेत आणि त्यात त्याने २८ गडी बाद केले आहेत. ११ धावा देत ५ गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

आयपीएल २०२१च्या लिलावात चेतनची बेस प्राईस २० लाख रुपये इतकी होती. मात्र त्याच्या गोलंदाजीचं कौशल्य पाहून राजस्थानने त्याला १.२ कोटी रुपये देत खरेदी केलं आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 9:32 pm

Web Title: ipl 2021 rr chetan sakaria debut match against punjab taken wicket rmt 84
Next Stories
1 शिखर धवनच्या ‘गब्बर डान्स’ची सोशल मीडियावर धूम
2 दिनेश कार्तिक नव्या इनिंगसाठी सज्ज; ‘या’ भूमिकेत दिसणार
3 RR vs PBKS : रंगतदार सामन्यात पंजाबची राजस्थानवर 4 धावांनी मात
Just Now!
X