News Flash

RR vs DC : ख्रिस मॉरिसची शेवटच्या षटकांत फटकेबाजी; चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा विजय!

आयपीएल २०२१ च्या आजच्या सातव्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये बरोबरीचा सामना झाला. दोन्ही संघांचे कर्णधार यष्टीरक्षकच असून दोन्ही कर्णधार पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपदाची

आयपीएल २०२१ च्या आजच्या सातव्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये बरोबरीचा सामना झाला. दोन्ही संघांचे कर्णधार यष्टीरक्षकच असून दोन्ही कर्णधार पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं. या सामन्यामध्ये अखेर राजस्थान रॉल्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ विकेट्सने पराभूत करत दोन अंकांची कमाई केली आहे. टॉस जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. उत्तरादाखल २० ओव्हर्समध्ये दिल्ली कॅपिटल्सनं १४७ धावापर्यंतच मजल मारता आली. विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं सुरुवात संथ केली. वरच्या फळीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर खाली आलेल्या डेविड मिलर आणि ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं सुरुवात सावध केली. पहिल्या २ ओव्हरमध्ये अवध्या ५ धावा राजस्थाननं केल्या. पण पुढच्या २ ओव्हरमध्ये राजस्थानच्या ३ विकेट्स पडल्या. तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ख्रिस वोक्सनं दिल्लीला पहिली विकेट मिळवून दिली. ९ धावांवर मनन वोराला वोक्सनं रबाडाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर धोकादायक जोस बटलरला रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यामुळे राजस्थानला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून राजस्थानची टीम सावरलीच नाही तोपर्यंत वोहराचा अप्रतिम झेल घेणाऱ्या रबाडाने गोलंदाजी करताना कर्णधार आणि पहिल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसनचा मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे राजस्थानची चौथ्याच षटकात १७ धावांवर ३ विकेट अशी अवस्था झाली.

RR vs DC : अप्रतिम पराग! भन्नाट थ्रोवर दिल्लीच्या कर्णधारालाच धाडलं मघारी!

डेविड मिलरनं शिवम दुबेला साथीला घेत राजस्थानच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली खरी. पण आठव्या षकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनने स्लीपमध्ये शिवम दुबेचा झेल टिपला. २ धावांवर शिवम दुबे माघारी परतला. त्यापाठोपाठ रियान परागनं देखील राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची निराशाच केली. एक बेजबाबदार फटका खेळताना पराग २ धावांवर झेलबाद झाला.

यानंतर आलेल्या राहुल तेवतियाला साथीला घेत डेविड मिलरनं राजस्थानचा डाव सावरला. या जोडीने १५व्या षटकापर्यंत राजस्थानला ९० धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, रबाडाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात राहुल तेवतिया १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेविड मिलरनं गिअर बदलला. आपलं अर्धशतक पूर्ण करणारा डेविड मिलर राजस्थानला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो, अशी आशा राजस्थानच्या चाहत्यांना वाटू लागली. आवेश खानने टाकलेल्या सोळाव्या ओव्हरमध्ये डेविड मिलरनं लागोपाठ दोन उत्तुंग षटकार खेचत टीमच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा रास्त असल्याचं देखील दाखवून दिलं. मात्र, त्यापुढचाच चेंडू आवेश खाननं वर टाकला आणि त्यावर चुकीचा फटका खेळून डेविड मिलरनं ललित यादवला सोपा झेल दिला.

मात्र, यानंतर ख्रिस मॉरिसनं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. शेवटच्या षटकांमध्ये ख्रिस मॉरिसनं जोरदार फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ख्रिस मॉरिसनं टॉम करनला उत्तुंग षटकार ठोकला! पुढच्याच चेंडूवर पुन्हा षटकार खेचून मॉरिसनं सामना राजस्थानच्या खिशात घातला. अवघ्या १८ चेंडूंमध्ये ख्रिस मॉरिसनं ३६ धावा केल्या. यामध्ये ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता!

RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल

राजस्थानसाठी उनाडकटची कमाल!

डावाच्या दुसऱ्याच षटकामध्ये राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकटनं धोकादायक पृथ्वी शॉला माघारी धाडलं. अवघ्या ५ धावांवर पृथ्वी शॉला उनाकटनं डेविड मिलरकडे झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि दिल्लीला पहिला झटका बसला! घरच्या मैदानावर खेळणारा पृथ्वी शॉ राजस्थानसाठी धोकादायक ठरू शकला असता, पण उनाडकटनं त्याचा अडथळा दुसऱ्याच षटकात बाजूला केला. त्यापाठोपाठ चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर जयदेव उनाडकटनं दिल्लीचा दुसरा सलामीवीर शिखर धवनला बाद केलं. यष्टीरक्षक आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं शिखर धवनचा अफलातून झेल टिपला आणि दिल्लीला चौथ्या ओव्हरमध्ये दुसरा झटका बसला.

शिखर धवननंतर मैदानात उतरलेल्या संयमी अजिंक्य रहाणेकडून दिल्लीच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पुन्हा उनाडकटचा कठीण पेपर समोर आला आणि अजिंक्य रहाणेनं त्याच्याच गोलंदाजीवर त्यालाच सोपा झेल दिला. त्यामुळे ६ ओव्हर्सनंतर दिल्लीची अवस्था ३६ धावांवर ३ विकेट अशी झाली. उनाडकटपाठोपाठ मुस्तफिझूरनं देखील आपली करामत दाखवत धोकादायक मार्कस स्टॉयनिसला अप्रतिम बॉलवर मॉरिसकरवी झेलबाद केलं.

यानंतर आलेल्या ललित यादवला साथीला घेऊन कर्णधार रिषभ पंतनं डावाला आकार द्यायला सुरुवात केली. खराब चेंडूंवर प्रहार करतानाच एकेरी-दुहेरी धावा करत धावफलक हलता ठेवला. अवघ्या ३० चेंडूंमध्ये रिषभ पंतनं ५० धावा फटकावत दिल्लीचा स्कोअर १२ ओव्हर्सनंतर ८५ धावांपर्यंत पोहोचवला. मात्र, दिल्लीसाठी हा दिलासा फार काळ टिकला नाही. रियान परागनं आपल्याच बॉलिंगवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिषभ पंतला धावचीत करून माघारी धाडलं. दिल्लीच्या अडचणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. रिषभ पंतसोबत डाव सावरणारा ललित यादव २० धावांवर असताना मॉरिसच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना बाद झाला. राहुल तेवतियानं त्याचा अप्रतिम झेल टिपला!

 

शेवटच्या फलंदाजांनी केलेल्या छोट्या भागीदाऱ्यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 11:22 pm

Web Title: ipl 2021 rr vs dc match result chris morris rajasthan win david miller inning pmw 88
टॅग : Cricket News,Ipl,IPL 2021
Next Stories
1 RR vs DC : अप्रतिम पराग! भन्नाट थ्रोवर दिल्लीच्या कर्णधारालाच धाडलं मघारी!
2 विराट कोहलीचा संघ IPL गुणतालिकेत अव्वल; नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट मीम्स
3 RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X