News Flash

IPL 2021 : राजस्थानचा रियान पराग पुन्हा एकदा ‘हटके’ सेलिब्रेशनमुळे चर्चेत!

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात केले अनोखे सेलिब्रेशन

रियान पराग

राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू रियान पराग मैदानावरील विविध मनोरंजक प्रकारांमुळे चर्चेच असतो. मागील मोसमात त्याने विकेट घेतल्यानंतर बिहू डान्स करत सेलिब्रेशन केले होते. या मोसमातही तो मागे राहिलेला नाही. आयपीएलच्या १८व्या सामन्यात तो पुन्हा एकदा आपल्या अनोख्या सेलिब्रेशनमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान वानखेडे मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात कोलकाताच्या पॅट कमिन्सचा झेल घेत रियान परागने अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला. कोलकाताच्या शेवटच्या षटकात मॉरिसच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात कमिन्स बाद झाला. परागने सीमारेषेवर झेल टिपला. यानंतर त्याने जवळ उभ्या असलेल्या राहुल तेवतियाला बोलावत मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा अभिनय केला. त्यांचे हे सेलिब्रेशन राजस्थानने ट्विटरवर शेअर केले आहे.

”या सेल्फीमध्ये कोणाला सहभागी व्हायचे आहे का?”, असे कॅप्शन राजस्थानने या फोटोला दिले आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात रियान परागने गोलंदाजी केली नाही. परंतु क्षेत्ररक्षण करताना दोन झेल घेतले.

 

वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या आयपीएलचा महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसच्या ४ बळींमुळे कोलकाताला २० षटकात ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 10:15 pm

Web Title: ipl 2021 rr vs kkr riyan parag selfie celebration goes viral adn 96
Next Stories
1 “करोनाच्या संकटात IPL?”, गिलख्रिस्टच्या ट्विटची सर्वत्र होतेय चर्चा
2 RR vs KKR : राजस्थानची कोलकातावर ६ गड्यांनी सरशी, मॉरिस चमकला
3 IPL 2021 : मुंबईला हरवल्यानंतर वसिम जाफरने केले ‘भन्नाट’ ट्विट
Just Now!
X