News Flash

IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ खास दिवशी होणार अंतिम सामना

दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येणार सामने

आयपीएल २०२१

करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.

आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

हेही वाचा – एका भारतीय व्यक्तीची वार्षिक कमाई म्हणजे रोहित शर्माचे ‘इतक्या’ तासांचे उत्पन्न!

 

बीसीसीआय आयपीएल २०२१चे उर्वरित सामने २५ दिवसांत घेणार आहे. डबल हेडर सामने कमी करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये उष्णता जास्त असल्याने खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागेल. बीसीसीआयने हा टप्पा २५ दिवसात संपवला, तर ८ डबल हेडर सामने कमी होतील.

हेही वाचा – टीम इंडियासाठी धोक्याची घंटा..! ‘या’ गोलंदाजाला मिळाली सरावाची परवानगी

पॅट कमिन्स आयपीएलबाहेर

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मोसमात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 5:07 pm

Web Title: ipl 2021 season to resume on september 19 final on october 15 adn 96
Next Stories
1 KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार
2 अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न
3 क्वारंटाइन कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी घेतली आपल्या कुटुंबीयांची भेट
Just Now!
X