मुंबई इंडियन्सच्या अनुभवी संघासमोर IPL 2020मध्ये अंतिम फेरीत दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. पण संपूर्ण स्पर्धेत युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन अशा काही खेळाडूंनी आपल्या खेळीच्या जोरावर सामने जिंकवून दिले. दिल्लीच्या संघात सुरूवातीला स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेनेही नंतर आपली प्रतिभा दाखवून दिली. या साऱ्यांना IPL 2021साठी संघात कायम राखण्यात आलं. काही खेळाडूंना लिलावाआधीच करारमुक्त करण्यात आलं तर काहींना लिलावादरम्यान विकत घेण्यात आलं. पण असं असलं तरी दिल्लीच्या स्टार खेळाडूंच्या वक्तव्यामुळे दिल्लीचं टेन्शन वाढलं आहे.
IPL Auction: “माझ्यावर जितकी बोली लागली तेवढे पैसे म्हणजे नक्की किती?”
दिल्लीने कायम राखलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा समावेश आहे. दिल्ली संघाच्या वेगवान गोलंदाजीचा भार त्याच्या खांद्यावर आहे. पण नुकतेच एका मुलाखतीत त्याने IPLपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आहे. “देशाचा विचार IPLपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तान दौरा IPLच्या वेळापत्रकावेळीच असेल तर अशा वेळी मी देशाला प्राधान्य देईन. तसे झाल्यास कदाचित IPLचा पहिला आठवडा मी दिल्ली संघाचा नसेन. मी नंतर संघात दाखल होईन”, असे रबाडाने मुलाखतीत सांगितलं.
अर्जुनवर टीका करणाऱ्यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…
दिल्लीने कायम राखलेले खेळाडू- शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स
players mein excitement double
Dilliwalon, our final squad for #IPL2021 looks no?
#YehHaiNayiDilli pic.twitter.com/Qsyv82bGHW— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 19, 2021
लिलावात खरेदी केलेले खेळाडू- स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 1:09 pm