News Flash

IPL 2021: मनीष पांडेनं घेतला अप्रतिम झेल; सोशल मीडियावर कौतुक

मनीष पांडेनं घेतलेल्या झेलचं कौतुक

सौजन्य: ipl t20.com

‘कॅचेस विन द मॅचेस’ या उक्तीप्रमाणे आयपीएलमध्ये प्रत्येक झेल महत्त्वाचा असतो. एक गडी बाद होणं त्याचबरोबर एक धावं वाचणं आणि नव्या फलंदाजाला सेट होण्यासाठी वेळ लागणं हे सर्व ओघानं येत असतं. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजीसोबत उत्तम झेल पकडताना पाहणं हे दिव्यच असतं. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मनीष पांडेनं घेतलेल्या झेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वॉशिंग्टन सुंदरनं ८ धावांवर खेळत असताना राशिद खानच्या गोलंदाजीवर फटका मारला. मात्र मनिष पांडेनं त्याचा उत्तम झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

मनीष पांडेच्या क्षेत्ररक्षणाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. हैदराबादनं चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या जोरावर बंगळुरुला १४९ धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; तिसरं नाव वाचून आश्चर्य वाटेल!

हैदराबादकडून जेसन होल्डरने ४ षटकात ३० धावा देत ३ गडी बाद केले. राशिद खानने ४ षटकात १८ धावा देत २ गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 10:06 pm

Web Title: ipl 2021 srh manish pandey taken brilliant catch of washington sundar rmt 84
Next Stories
1 आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; तिसरं नाव वाचून आश्चर्य वाटेल!
2 माजी क्रिकेटपटू वसीम जाफरचा पाकिस्तानच्या बाबर आझमला इशारा
3 RCB vs SRH : विराटसेनेचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी केली मात
Just Now!
X