News Flash

PBKS vs SRH : हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा

चेपॉक मैदानावर रंगणार सामना

वॉर्नर वि. राहुल

आयपीएलच्या गुणतालिकेत खाली असलेल्या दोन संघात आज डबल हेडरचा पहिला सामना रंगणार आहे. आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना होणार असून हैदराबादला आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. तर, पंजाब संघ तीन सामन्यात दोन विजयांसह सातव्या स्थानावर आहे.

गेल्या सत्रात प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या हैदराबाद संघाकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या दोन सामन्यात कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या संघाच्या मधल्या फळीत सुधारणा करणे हैदराबादला आवश्यक आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या केन विल्यमसनला या सामन्यासाठी संघात जागा मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मयंक अग्रवालचा फॉर्म ही पंजाबसाठी दिलासादायक गोष्ट आहे. कर्णधार केएल राहुलने मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली. पण त्याची खेळी काहीशी संथ होती. ख्रिस गेलला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. याशिवाय निकोलस पूरनसुद्धा काही खास करू शकलेला नाही. युवा फलंदाज शाहरुख खानकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाईल.

दोन्ही संघ –

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियांम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जे. सुचीत.

पंजाब किंग्ज: लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रभसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सरफराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, दर्शन नलकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मालन, झाई रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोईसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन एलन आणि सौरभ कुमार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 8:00 am

Web Title: ipl 2021 srh vs pbks match preview adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 कोलकाताची आज चेन्नईशी झुंज
2 पराभवांची कोंडी फोडण्याचे हैदराबादपुढे आव्हान
3 MI vs DC : तब्बल 11 वर्षानंतर दिल्लीचा चेन्नईत विजय!
Just Now!
X