News Flash

Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं

आउट झाल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे परतताना रागाच्या भरात कोहलीने बॅटने उडवली खुर्ची

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB)कर्णधार विराट कोहलीला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (SRH)झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहली रागात होता, व त्याने ड्रेसिंग रुमकडे परतताना जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली, नंतर बॅटने खुर्ची उडवली होती. याची गंभीर दखल घेत मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलंच फटकारलं आहे.

IPL प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कोहलीला आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचं नुकसान करणं अशा बाबींचा समावेश होतो. त्यानंतर मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलंच फटकारलं. नंतर आयपीएलनेही एका निवेदनाद्वारे याबाबत “विराट कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे”, अशी माहिती दिली.


कालच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 29 चेडूंमध्ये 33 धावा केल्या. पण जेसन होल्डरने त्याला विजय शंकरकडे झेल द्यायला भाग पाडलं. नंतर मैदानाबाहेर जाताना कोहली रागात होता. त्याने डग आउटमध्ये ठेवलेल्या खुर्चीला बॅटने उडवण्याआधी एका जाहिरातीच्या फलकावरही बॅट मारली. बंगळुरूच्या संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला, पण कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:39 pm

Web Title: ipl 2021 srh vs rcb virat kohli reprimanded for ipl code of conduct breach sas 89
टॅग : IPL 2021
Next Stories
1 नव्या दमाच्या कर्णधारांची झुंज!
2 RCB vs SRH : बंगळुरूने हैदराबादकडून हिसकावला विजयाचा घास!
3 IPL 2021: मनीष पांडेनं घेतला अप्रतिम झेल; सोशल मीडियावर कौतुक
Just Now!
X