News Flash

‘‘बाबा, तुमची आठवण येतेय’’, वॉर्नरच्या मुलींचे ‘ते’ चित्र व्हायरल

करोनामुळे आयपीएल २०२१ स्थगित

डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुली

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी मागील काही दिवस चांगले नव्हते. संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. हे सर्व असूनही डेव्हिड वॉर्नरने राजस्थानच्या विरुद्ध सामन्यात १२वा खेळाडू म्हणून काम केले. करोनाच्या भीतीमुळे बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित केला. या निर्णयानंतर वॉर्नरच्या मुलींनी आपल्य़ा बाबांसाठी एक चित्र पाठवत खास संदेश दिला आहे.

डेव्हिड वॉर्नरने हे चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ”बाबा, तुम्ही सरळ घरी या. आम्हाला तुझी खूप आठवण येते आणि आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या मुली आयव्ही, इंडी आणि इस्ला”, असे या चित्रात म्हटले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि भारतीय क्रिकेट बोर्डानेही एक प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे, की खेळाडू त्यांच्या घरी जाऊ शकतात. त्यांची व्यवस्था केली जाईल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

डेव्हिड वॉर्नरसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगला ठरला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने ६ पैकी ५ लढती गमावल्या. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्याच्या जागी केन विल्यमसनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले. विल्यमसनच्या नेतृत्वातही हैदराबादला पराभवाचा धक्का बसला

.आयपीएलच्या स्पर्धा स्थगित झाल्याने बीसीसीआयचे २००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचे सामने देखील रद्द होण्याची शक्यता आहे. जर भारताकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्यावर बीसीआयचे यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 6:46 pm

Web Title: ipl 2021 suspended srh batsman david warners daughters emotional message to father adn 96
Next Stories
1 IPL पुढं ढकललं..आता टी-२० वर्ल्डकपचं काय?
2 दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला करोनाची लागण
3 आयपीएल स्थगित; बीसीसीआयचं ‘इतक्या’ कोटीचं नुकसान होण्याची शक्यता
Just Now!
X