News Flash

विराट कोहलीचा संघ IPL गुणतालिकेत अव्वल; नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट मीम्स

मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

विराट कोहली नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.आयपीएल २०२१ मध्ये विराटच्या बंगळुरु संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिला सामन्यात बंगळुरुने मुंबईला पराभूत केलं. तर दूसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभवाची चव चाखली. या दोन विजयांसह बंगळुरुचा संघ ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर होताना दिसत आहेत. विश्वास बसत नसल्याचं सांगत मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. हे मीम्स पाहून विराट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना हसावं की रडावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.


२००८ सालापासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु एकही चषक जिंकलेला नाही. मागच्या पर्वात विराटच्या बंगळुरु संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे यंदा तरी विराटचा संघ आयपीएल चषक आपल्या नावावर करेल का असा प्रश्न चाहते विचारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 9:36 pm

Web Title: ipl 2021 virat kohli rcb reached on top position social media user share funny memes rmt 84
टॅग : IPL 2021,Rcb,Virat Kohali
Next Stories
1 RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल
2 IPL 2021 : हर्षल पटेलला ‘त्या’ बॉलनंतरही थांबवलं का नाही? वॉर्नर भडकला, पण हेड कोचने खरा नियम सांगितला!
3 RR vs DC IPL 2021 : चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय!
Just Now!
X