News Flash

IPL 2018: ‘या’ खेळाडुला संघात घेता न आल्याचे ‘मुंबई इंडियन्स’च्या नीता अंबानींना दु:ख

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना रिटेन केले

जेव्हा आयपीएलची सुरूवात झाली तेव्हापासून हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लिलावात चेन्नई सुपर किंग्जने हरभजन सिंगला संघात घेतले.

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी शनिवारी आणि रविवारी खेळाडुंचा लिलाव पार पडला. या लिलाव प्रक्रियेत सर्वच संघ मालकांनी सर्वोत्कृष्ट खेळाडुंना आपल्या संघात घेण्यासाठी भरपूर पैसे मोजले. आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सनेही एकापेक्षा एक खेळाडू आपल्या संघात घेतले आहेत. पण संघ मालक नीता अंबानी यांना एका खेळाडुला आपल्या संघात घेता न आल्याचे खूप दु:ख आहे. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, लिलाव प्रक्रियेनंतर मी खूप आनंदी आहे. ही खूप दमछाक करणारी प्रक्रिया होती. पण मला एका गोष्टीचं दु:ख आहे की आम्ही भज्जीला (हरभजन सिंग) संघात घेऊ शकलो नाही. यामुळे मी खूप निराश आहे, असे त्या म्हणाल्या.

दोन टप्प्यातील लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी नीता अंबानी म्हणाल्या, हा खेळाडू किंवा तो खेळाडू मला घेता आला नाही यामुळे मी निराश आहे, हे मी सांगू शकत नाही. पण मला एका गोष्टीचं खूप दु:ख आहे की, भज्जीला आमच्या संघात घेता आले नाही. मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना रिटेन केले पण हरभजनला त्यांनी खरेदी केले नाही. आकाश अंबानी याचाही याबाबत आई नीता यांच्यापेक्षा वेगळे विचार नाहीत.

दरम्यान, जेव्हा आयपीएलची सुरूवात झाली तेव्हापासून हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लिलावात चेन्नई सुपर किंग्जने हरभजन सिंगला संघात घेतले. चेन्नईने हरभजन सिंगसाठी दोन कोटी रूपये मोजले. दहा वर्षांनंतर नवीन संघात संधी मिळाल्यामुळे हरभजन खूश आहे. त्याने तामिळमध्ये ट्विट करून आपला आनंदही व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 3:13 pm

Web Title: ipl auction 2018 csk rcb mi kkr team nita ambani disappointed after not get harbhajan singh in her franchise mumbai indians
Next Stories
1 IPL 2018: सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा मंजूर अहमद पंजाबकडून खेळणार
2 IPL 2018: आयपीएल लिलावात महिला क्रिकेटपटू का नाही: ऋषी कपूर
3 IPL 2018: संदीप लामिचेन आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू
Just Now!
X