28 September 2020

News Flash

IPL 2019 : RCB चा जुन्या खेळाडूंवर विश्वास, सरफराज खान करारमुक्त

एबीडीलाही संघात जागा

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आगामी हंगामासाठी जुन्या खेळाडूंवर विश्वास ठेवलाय. गेल्या दोन हंगामांमध्ये बंगळुरुच्या संघाला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे आगामी हंगामासाठी बंगळुरुचा संघ महत्वाचे बदल करेल अशी आशा होती. मात्र बंगळुरुने आगामी हंगामासाठी सरफराज खानला करारमुक्त केलं आहे.

२०१९ आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कायम राखलेले खेळाडू –

विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रँडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी

२०१९ आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने करारमुक्त केलेले खेळाडू –

सरफराज खान, अनिकेत चौधरी, अनिरुद्ध जोशी, पवन देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 8:53 pm

Web Title: ipl auction 2019 rcb release 10 players
टॅग IPL 2019,Rcb
Next Stories
1 IPL 2019 : युवराज पुन्हा लिलावाच्या मैदानात, किंग्ज इलेव्हन पंजाबकडून युवराज करारमुक्त
2 IPL 2019 : सनराईजर्स हैदराबाद संघाकडून ९ खेळाडू करारमुक्त; डेव्हिड वॉर्नरला संघात स्थान
3 Hong Kong Open Badminton : सरळ गेममध्ये सिंधूचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X