20 September 2019

News Flash

IPL – माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू सनराईजर्स हैदराबादच्या सहायक प्रशिक्षकपदी

संघ प्रशासनाकडून अधिकृत घोषणा

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीन याची आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नोंद करण्यात आली आहे. हॅडीन आगामी हंगामात इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासोबत हैदराबादच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. बेलिस आणि हॅडीन यांनी याआधीही कोलकाता नाईट रायडर्स संघाला मार्गदर्शन केलं आहे.

सनराईजर्स हैदराबादच्या ट्विटर हँडलवरुन हॅडीनच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

आयपीएलच्या गत हंगामात हैदराबादचा संघ प्ले-ऑफसाठी दाखल झाला होता, मात्र अंतिम फेरी गाठणं त्यांना शक्य झालं नाही.

First Published on August 20, 2019 8:32 pm

Web Title: ipl brad haddin named assistant coach of sunrisers hyderabad psd 91
टॅग Brad Haddin,Ipl,Srh