देवेंद्र पांडे/दक्ष पनवार, एक्स्प्रेस वृत्तसेवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे बडे नेते राजीव शुक्ला यांचे स्वीय साहाय्यक अक्रम सैफी यांनी उत्तर प्रदेशच्या २३ वर्षांखालील संघात निवड करून देण्यासाठी पैशांची तसेच शरीरसुखाची मागणी केल्याचे स्टिंग ऑपरेशन लखनौ येथील एका हिंदी भाषिक वृत्तवाहिनीने केले होते.

मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत चौकशीनंतर सैफी यांना चार महिन्यांनंतरच उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने निर्दोषत्व प्रमाणपत्र (क्लीन चिट) दिली आहे. आता पुन्हा एकदा सैफी यांचा क्रिकेटवर्तुळात वावर सुरू झाला आहे.

बीसीसीआयच्या स्वत:च्या लाचलुचपत प्रतिबंधक तत्त्वांकडे तसेच अनेक क्रिकेटपटूंनी आणि माजी सहकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासाअंती समोर आले आहे. सहारनपूर या सैफी यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन आणि अनेक क्रिकेटपटू तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. सैफी यांची शुक्ला यांच्याशी असलेली जवळीक आणि सैफींचा उत्तर प्रदेश संघातील हस्तक्षेप याबाबत अनेकांनी धक्कादायक खुलासे केले.

सैफी यांनी राहुल शर्मा या उत्तर प्रदेशच्या क्रिकेटपटूकडून पैसे तसेच हॉटेलमध्ये शरीरसुखासाठी महिला पाठवण्याची मागणी केली होती. या आरोपांप्रकरणी बीसीसीआयने चौकशी करण्याआधीच सैफी यांनी आयपीएलच्या व्यवस्थापकपदाचा राजीनामा दिला.

‘‘सैफी यांच्या राजीनाम्यामुळे आम्हाला ही चौकशी करता आली नाही,’’ असे बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग शेखावत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl chairman rajiv shukla aide akram saifi get clean chit
First published on: 16-11-2018 at 03:52 IST