आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय मिळवला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीचा विजय अवघ्या एका धावेने हुकला. दिल्लीचा असाच पराभव पाच वर्षापूर्वी गुजरातनं केला होता.

२७ एप्रिल २०२१ ला बंगळुरुनं ज्या प्रमाणे दिल्लीला पराभूत केलं. असाच सामना पाच वर्षापूर्वी याच तारखेला दिल्ली आणि गुजरात दरम्यान झाला होता. तारीख आणि पराभूत धावसंख्येत साम्य असल्याचं दिसून आलं आहे. आयपीएल २०१६ मध्ये गुजरात लायन्सनं दिल्लीसमोर विजयासाठी १७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. विजयासाठी १७२ धावांची आवश्यकता होती. मात्र दिल्लीचा संघ १७१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अवघ्या १ धावाने गुजरातनं दिल्लीला पराभूत केलं होतं.

अमित मिश्राकडून मैदानात चूक; पंचांनी गोलंदाजी रोखली!

पाच वर्षापूर्वीच्या सामन्यात ऋषभ पंतनं १७ चेंडूत २० धावांची खेळी केली होती. त्यात त्याने २ दोन चौकार मारले होते. फॉकनरच्या गोलंदाजीवर तेव्हा प्रविण कुमारनं त्याचा झेल घेतला होता. आता बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने नाबाद ५८ धावांची खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.