News Flash

‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी श्रीनिवासन यांची पुन्हा नेमणूक करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात यावी या आशयाची एन.श्रीनिवासन यांची याचिका आज(गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

| May 22, 2014 01:11 am

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात यावी या आशयाची एन.श्रीनिवासन यांची याचिका आज(गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
‘आयपीएल’ फिक्सिंग प्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे श्रीनिवासन यांना ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. परंतु, ‘आयपीएल’ सोडून इतर सर्व प्रकरणांमध्ये ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष म्हणून काम करण्याची परवानगी मिळावी अशी याचिका श्रीनिवासन यांच्याकडून करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस.चौहान आणि ए.के.सिकरी यांच्या खंडपीठाने श्रीनिवासन यांना आता असा बदल कशासाठी हवा आहे? तसेच जेव्हा अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आले तेव्हा असा युक्तीवाद त्यांनी का केला नाही? असे सवाल उपस्थित करत श्री.निवासन यांना फटकारले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 1:11 am

Web Title: ipl corruption case supreme court declines to reinstate ousted bcci chief srinivasan
टॅग : Bcci,Ipl,Supreme Court
Next Stories
1 भारतात जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा
2 कबड्डीला अच्छे दिन आए है..
3 स्वित्र्झलड (इ-गट) – आहे नैपुण्य तरी..!
Just Now!
X