News Flash

IPL GL vs KXIP: किंग्ज इलेव्हन पंजाबचा गुजरातवर २७ रन्स राखून विजय

मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

मॅचचे लेटेस्ट अपडेट्स

आज आयपीएलमध्ये सामना रंगला तो गुजरात लायन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये. या मॅचमध्ये पंजाबने २७ रन्स राखून गुजरात लायन्सचा पराभव केला.याआधीच्या मॅचमध्ये गुजरात लायन्स ने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता त्यामुळे तिथली विजय परंपरा कायम ठेवण्याचा त्यांना मानस होता. पण ते त्यांना काही ते शक्य झाले नाही. पंजाबची या मोसमातली कामगिरी काहीशी फिकी पडल्याने त्यांना आजची मॅच जिंकायला प्रयत्न करायला सर्वप्रकारे प्रयत्न केले. आणि त्यांच्या प्रयत्यांना यशही आलं. गुजरातने टाॅस जिंकत पहिली बाॅलिंग करायचा निर्णय घेतला आणि १८८ ची अवाढव्य धावसंख्या रचली. उतरादाखल मैदानावर उतरलेल्या गुजरातच्या बॅट्समनचे प्रयत्न अपुऱे पडले. १०२ लाच त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये होता. १०२ धावसंख्येवर त्यांच्या लागोपाठच्या बाॅल्सवर २ विकेट्स गेल्या. या मॅचमध्ये हाशिम आमला आणि गुजरातच्या  दिनेश कार्तिकने अर्धशतकं झळकावली.

LIVE UPDATES:

७:२९- किंग्ज इलेव्हन पंजाबचा गुजरातवर २७ रन्स राखून विजय

७:१९- गुजरातला १२ बाॅल्समध्ये ४१ रन्स हव्यात

७:१४- दिनेश कार्तिकची हाफ सेंच्युरी पूर्ण

७:१३- गुजरातची सातवी विकेट, मॅचवर पंजाबची पकड

६:५६- ड्वेन स्मिथ, नाथ माघारी, गुजरात १०२/६

६:५१-  रवींद्र जाडेजा पॅव्हेलियनमध्ये, गुजरातच्या चार विकेट गेल्या

५:२६- २० ओव्हर्समध्ये पंजाबचा स्कोअर १८८/७

५:२३- अक्षर पटेल झेलबाद

५:२२- अक्षर पटेलचा धुवाधार सिक्सर

४:५१- हाफ सेंच्युरीनंचतरही हाशिम आमलाची फटकेबाजी सुरू

४:४२ हाशिम आमलाची हाफ सेंच्युरी पूर्ण

४:३८- पंजाबची दुसरी विकेट पंजाब , ८१-२

४:०९- पंजाबला पहिला धक्का, मनन वोहरा आऊट, पंजाब ११-१

३:३०- गुजरातटचा टाॅस जिंकून पहिली बाॅलिंग करण्याचा निर्णय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 3:44 pm

Web Title: ipl cricket live score gujarat lions vs kings 11 punjab gl kxip
Next Stories
1 ‘या’ संघाचा फक्त २८ धावांत उडाला खुर्दा, त्यातही १३ धावा अवांतर
2 मुंबईच अव्वल!
3 सुपरमॅन!
Just Now!
X