News Flash

IPL Final 2019 : रोहितची चिमुकलीही तयार.. पहा खास फोटो

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आज अंतिम सामना

IPL 2019 : Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यानंतर चेन्नईने शुक्रवारी दिल्लीला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दोन कर्णधार आमने सामने येणार आहेत.

रोहित शर्माने IPL कारकिर्दीत ४ हजारांहून अधिक म्हणजेच ४८८३ धावा केलेल्या आहेत. पण यंदाच्या हंगामात त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. रोहितने IPL 2019 मध्ये आतापर्यंत १४ सामन्यांत ३० च्या सरासरीने ३९० धावा केल्या. त्यातही केवळ २ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितची पत्नी रितिका आणि चिमुकली समायरा या दोघी सामना बघायला आल्या असताना रोहितला चांगली कामगिरी करून दाखवायची होती. पण तितके यश आले नाही. तरीदेखील दुसरे अर्धशतक रोहितने समायरा स्टेडियममध्ये असताना ठोकले. आजच्या सामान्यासाठीही रोहितची चिमुकली समायरा स्टेडियममध्ये हजर असणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डल वरून बेबी समायरा अंतिम सामन्यासाठी तयार असल्याचे ट्विट करण्यात आले आहे. तसेच तिचा एक गोंडस फोटोदेखील ट्विट करण्यात आला आहे.

IPL 2019 मध्ये वानखेडे मैदानावर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर मुंबईने आपला पहिला सामना खेळण्याआधी मुंबई इंडियन्सने तिच्यासाठी छानशी आणि छोटीशी जर्सी तिच्यासाठी डिजाईन केली होती. या फोटोत मुंबई इंडियन्सच्या चमूतील सगळ्यात मोठ्या फॅनसाठी लहान आकाराची जर्सी असा उल्लेख करण्यात आला होता. हा फोटो रोहितच्या चिमुकली समायरा हिच्या जर्सीचा होता आणि रोहितची पत्नी रितिकाने हिने हा फोटो काढला होता.

दरम्यान, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील अंतिम सामना रविवारी ७.३० ला सुरु होणार असून या सामन्यासाठी चाहते पूर्णपणे तयार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 5:36 pm

Web Title: ipl final 2019 mi vs csk rohit sharma daughter samaira ready for final with mumbai indians jersey
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL Final 2019 : चेन्नईचे शेर मुंबईपुढे नेहमीच ढेर! पहा ही भन्नाट आकडेवारी
2 #LSPOLL : विजेतेपदासाठीच्या लढाईत वाचकांची पसंती मुंबईला
3 आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देताना सचिन भावूक
Just Now!
X