03 April 2020

News Flash

आयपीएल सगळ्यात मोठा घोटाळा ! माजी कर्णधार बिशनसिंह बेदींचा आरोप

वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केलं वक्तव्य

भारताचे माजी फिरकीपटू आणि कर्णधार बिशनसिंह बेदी यांनी आयपीएलच्या आयोजनावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. आयपीएल हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं वक्तव्य, बिशनसिंह बेदी यांनी ‘आज तक’ वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना हा आरोप केला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणानंतर बिशनसिंह बेदी हे सतत आयपीएलच्या विरोधात वक्तव्य करत आहेत.

“आयपीएलबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. या देशात आयपीएलसारखा कोणता मोठा घोटाळा झाला नसेल. आयपीएलमधला पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणीही सांगू शकणार नाही. आयपीएलचा मधला हंगाम हा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये हे परदेशात नेण्यात आले, सरकारी यंत्रणांना याबद्दलची माहितीही नव्हती.” बेदी यांनी आयपीएलच्या आयोजनावर कडक शब्दांमध्ये टीका केली.

आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड होणं ही गोष्ट योग्य नाही. स्थानिक स्पर्धांमध्ये करण्यात आलेल्या कामगिरीचाही विचार करण्यात यावा. ज्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठ्या रकमेची बोली लागत नाही, ते खेळाडू मग बेटींगकडे ओढले जातात. स्थानिक खेळाडूंच्या खेळाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत? बेदी आज तक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2018 4:51 pm

Web Title: ipl is bigger scam says former indian skipper bishansingh bedi
टॅग Ipl
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीने रोखला गुजरातचा विजयरथ
2 IND vs AUS : स्पायडर कॅम आला मॅक्सवेलच्या मदतीला धावून
3 सर जाडेजांनी घेतली सपत्नीक नरेंद्र मोदी यांची भेट
Just Now!
X