03 March 2021

News Flash

IPL 2017, RPS vs MI : पुण्याची ‘स्मित’ खेळी, मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

स्मिथच्या नाबाद ८४ धावा, तर रहाणेचे ६० धावांचे योगदान

IPL Live Score, Mumbai Indians vs Rising Pune Supergiants

कर्णधार स्टीव्ह स्मिथची ५४ चेंडूतील नाबाद ८४ धावांची तुफान खेळी, अंजिक्य रहाणेची अर्धशतकी साथ आणि धोनीच्या समंजस फलंदाजीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने आयपीएलमध्ये विजयी श्रीगणेशा केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १८५ धावांचे आव्हान पुण्याच्या संघाने सात गडी राखून गाठले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथने आपला फॉर्म कायम राखत स्पर्धेत दमदार सुरूवात केली आहे. महेंद्रसिंग धोनीसारखा मॅच विनर खेळाडू नॉन स्ट्राईकवर असताना स्मिथने कर्णधारी भूमिका बजावत अखेरच्या षटाकात केरॉन पोलार्डला दोन षटकार ठोकत सामना जिंकला. अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूवर केवळ तीन धावा आल्या होत्या. धोनीकडून यावेळी मोठी फटके पाहायला मिळत नव्हते. त्यात धोनीला १९ व्या षटकात टीम साऊदीकडून झेल सुटल्यानने जीवनदान देखील मिळाले होते. अशावेळी मैदानात चांगला जम बसवलेल्या स्मिथने पुढाकार घेऊन अखेरच्या षटकाच्या तिसऱया चेंडूवर षटकार ठोकून सामना २ चेंडूत ४ धावा असा आणला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार लगावून स्मिथने विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, सलामीवीर अजिंक्य रहाणेने सुरूवातीपासूनच फटकेबाजीला सुरूवात करून संघाला चांगली सुरूवात  करून देत पाया रचला. जोरकस फटके खेळण्याच्या नादात न पडता रहाणेने आपले तंत्रशुद्ध फटक्यांचा नजराणा पेश करून २७ चेंडूत अर्धशतक ठोकले. स्मिथसोबत रहाणेने दुसऱया विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. संघाची धावसंख्या ९३ असताना रहाणे झेलबाद झाला. रहाणेने ३४ चेंडूत ३ षटकार आणि चार चौकार लगावून ६० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे स्मिथला बेन स्टोक्सने चांगली साथ दिली. स्टोक्सने १४ चेंडूत २१ धावा केल्या. स्टोक्स बाद झाल्यानंतर धोनी मैदानात आला तेव्हा पुण्याला विजायासाठी ४२ धावांची गरज होती. धोनीने समंजसपणे फलंदाजी करत स्मिथला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल याचा प्रयत्न करून त्याच्यासोबत नाबाद ४४ धावांची भागीदारी रचली.

सामन्याचा नाणेफेक जिंकून पुण्याच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. जोस बटलर आणि पार्थिव पटेल यांनी पुण्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत तुफान सुरूवात केली होती. पुण्याच्या संघात असलेली गोलंदाजांची कमतरता स्पष्ट दिसून आली. पण फिरकीपटू इम्रान ताहीर पुण्यासाठी तारणहार ठरला. ताहीरने आपल्या पहिल्याच षटकात पार्थिव पटेलचा काटा काढला. त्यानंतर आपल्या दुसऱया षटकात ताहीरने आपल्या गुगलीवर रोहित शर्माला(३) क्लीनबोल्ड केले. तुफान फटकेबाजी करत असलेल्या जोस बटलरलाही त्याच षटकात ताहीरने माघारी धाडले. जोस बटलर ३८ धावा ठोकून माघारी परतला. मुंबई इंडियन्सची अवस्था बिनबाद ४७ धावा असताना पुढीत तीन षटकात ३ बाद ६२ अशी झाली.

ताहीरसोबतच रजत भाटीयाने अंबाती रायुडू आणि कुणाल पांड्या यांना बाद करून पुण्याच्या संघाला सामन्यात कमबॅक करून दिले. मग बेन स्टोक्सने पोलार्डचा काटा काढला. पोलार्ड तंबूत दाखल झाला तेव्हा मुंबई इंडियन्सची धावसंख्या ७ बाद १४७ अशी होती. हार्दिक पंड्याने सामन्याच्या अखेरच्या षटकात अशोक दिंडाला धुतले. एकाच षटकात चार खणखणीत षटकार आणि एक चौकार ठोकून पंड्याने संघाला १८४ धावांपर्यंत पोहोचवले. अशोक दिंडाच्या चार षटकांत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी तब्बल ५७ धावा वसुल केल्या. शिवाय, दिंडाला एकही विकेट मिळवता आली नाही. पंड्याने १५ चेंडूत नाबाद ३५ धावा ठोकल्या.

सामनावीर- स्टीव्ह स्मिथ

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 7:33 pm

Web Title: ipl match 2017 live update streaming rising pune supergiant vs mumbai indians rps vs mi pune rohit sharma vs steve smith score schedule
Next Stories
1 IPL 2017: टीव्हीवर तेव्हा पाहिलेला तडाखेबाज युवराज पुन्हा पाहिला: वॉर्नर
2 IPL 2017: दिल्ली संघातील ऋषभ पंतच्या वडिलांचे आकस्मिक निधन
3 IPL 2017 : ड्वेन ब्राव्होची ‘क्यूट फ्रेंड’ अनुषा दांडेकर
Just Now!
X