IPL मधील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळलेला रसिख सलाम याला भारताच्या युवा १९ वर्षाखालील संघातून वगळण्यात आले आहे. चुकीचा जन्म दाखला / वयाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे BCCI ने त्याच्यावर वयचोरीचा ठपका ठेवला असून त्याच्यावर २ वर्षाच्या बंदीची कारवाई केली आहे. इंग्लंडमध्ये २१ जुलै पासून तिरंगी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. मात्र त्याच्या या चुकीमुळे त्याला बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्या जागी संघात प्रभात मौर्य याला संधी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
रसिख सलाम

 

रसिख सलाम याच्यावर वयचोरीच्या आरोपाखाली BCCI कडून दोन वर्षांची घालण्यात आली आहे, असे BCCI च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. IPL च्या बाराव्या हंगामात घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने जम्मू-काश्मीरच्या रसिख सलाम दर या खेळाडूला जागा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. १७ वर्षीय रसिख हा मुळचा जम्मू-काश्मीरचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये रसिखने आपल्या गोलंदाजीने काही काळ शिखर धवनसारख्या फलंदाजाला चांगलंच अडचणीत आणलं होतं.

त्याच्या बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी –
– १७ वर्ष आणि ३५३ दिवस, मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा रसिख सलाम सर्वात तरुण खेळाडू ठरला
– रसिख मुळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अश्मुजी गावचा रहिवासी
– रसिख हा स्वभावाने लाजाळू आहे
– २०१८ साली १९ वर्षाखालील कूचबिहार करंडक स्पर्धेदरम्यान रसिख मुंबई इंडियन्सच्या नजरेस आला
– रसिखने मुंबई इंडियन्सच्या नवी मुंबई येथे झालेल्या दोन ट्रेनिंग कँपला हजेरी लावली
– बाराव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने रसिखवर २० लाखांची बोली लावली
– रसिखला आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात बळी घेता आला नाही, पण त्याने साऱ्यांची मनं जिंकली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl mumbai indians rasikh salam 2 years ban faulty birth certificate bcci vjb
First published on: 20-06-2019 at 11:24 IST