News Flash

‘आयपीएल’मधील मिस्ट्री गर्ल पुन्हा चर्चेत; म्हणते …

दीपक चहरची बहीण मालती ही आयपीएलच्या अनेक सामन्यांना प्रेक्षकांमध्ये दिसली. तिने प्रेक्षकांचेच नव्हे तर कॅमेरामनचेही लक्ष वेधले.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईच्या संघाने हैदराबादवर मात करून आपली तिसरी ट्रॉफी जिंकली. या हंगामात अनेक विक्रम केले गेले. अनेक उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून जगापुढे आले. तसेच खेळाडूंव्यतिरिक्त काही नवे चेहरे आणि काही मिस्ट्री गर्ल्सही दिसल्या. त्या मिस्ट्री गर्ल्सपैकी एक मुलगी म्हणजेच मालती चहर. चेन्नई संघाकडून खेळणाऱ्या दीपक चहरची बहीण मालती ही आयपीएलच्या अनेक सामन्यांना प्रेक्षकांमध्ये दिसली. आणि तिने प्रेक्षकांचेच नव्हे तर कॅमेरामॅनचेही लक्ष वेधले.

मालती आणि दीपक या दोघांचे नाते अतिशय खेळीमेळीचे आहे. ते दोघेही कायम एकमेकांची मस्करी करत असतात. काही दिवसांपूर्वी मालतीने नेट्स मध्ये क्रिकेट खेळत असल्याची व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. मात्र या पोस्टवर दिपकने तिची चांगलीच टिंगल उडवली होती. आमच्या अकॅडमी मधला चार वर्षांचा मुलगाही तुझ्यापेक्षा जास्त चांगली फलंदाजी करू शकतो, अशी कमेंट दिपकने केली होती. त्यामुळे मालतीचा हिरमोड झाला होता.

मात्र, मालतीने तो राग धरून ठेवला नाही. दीपक चहरचे नुकतेच भारत अ संघात नाव समाविष्ट करण्यात आले. त्यावेळी चहरने टीम इंडियाची त्याच्या नावाची जर्सी अंगावर घालून फोटो काढला. हा फोटो मालतीने स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट केला. आणि त्याखाली लिहिले की हे खूपच अभिमानास्पद आहे. ९० पासून ९ नंबरच्या जर्सीपर्यंत यायला तुला खूप परिश्रम घ्यावे लागले. पण तू तुझ्या हिमतीवर आणि कामगिरीवर संघात स्थान मिळवलेस. मला तुझा अभिमान आहे.

पण ती इतकेच बोलून न थांबता तिने पुढे खोडकरपणे ‘भाई, खूपच हँडसम दिसतोयस’ असेही लिहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 3:31 pm

Web Title: ipl mystery girl deepak chahar malti chahar tweet
Next Stories
1 चिंता नको, माझ्या गर्लफ्रेंडला राणीसारखं वागवेन, लोकांपासून लपवणार नाही – लोकेश राहुल
2 Video : ‘गेल डन!’; नेमबाजीतही गेल सरस… हा व्हिडीओ पाहाच
3 Intercontinental Cup – भारतात फुटबॉल फिव्हर; भारताचे सर्वच्या सर्व सामने ‘हाऊसफुल्ल’
Just Now!
X