इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) २०२१च्या उर्वरित हंगामापूर्वी फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्सने गरूडझेप घेतली आहे.  अमेरिकेच्या सर्वात मोठ्या क्रीडा गुंतवणूकींपैकी एक असलेल्या रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सने राजस्थान रॉयल्समधील १५ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. रेडबर्डने रॉयल्सशी झालेल्या कराराची रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र, या व्यवहाराचे मूल्य २५० मिलियन डॉलर्स दरम्यान इतके आहे.

मनोज बदाले यांच्या मालकीच्या एमर्जिंग मीडियाकडे राजस्थान रॉयल्समध्ये सर्वाधिक हिस्सेदारी आहे. या करारानंतर रेडबर्डचे रॉयल्समध्ये १५ टक्के भागभांडवल असेल आणि एमर्जिंग मीडियाची हिस्सेदारी ५१ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

 

राजस्थान रॉयल्सने प्रसिद्धीनुसार, रेडबर्डचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार जेरी कार्डिनेल म्हणाले, ”आयपीएल ही एक गतीशील लीग आहे, जी एक जागतिक प्रेक्षक आणि खेळाडूबद्दल पुढचा विचार करते.” मनोज बदाले म्हणाले, “राजस्थान रॉयल्सच्या फ्रेंचायझीच्या वाढीची आणि यशाची दृष्टी सांगण्यासाठी आम्ही रेडबर्ड या अनुभवी गुंतवणूक फर्मबरोबर भागीदारी करत आहोत. याचा आम्हाला फार आनंद होत आहे.”

हेही वाचा – ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला आवडते दिशा पटानी, इंग्लंडमध्ये घ्यायचाय सुट्ट्यांचा आनंद!

राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रणजित बारठाकुर म्हणाले, “दीर्घकालीन गुंतवणूकदार एमर्जिंग मीडिया कडून या अतिरिक्त गुंतवणूकीची घोषणा केल्याचा आणि आमचा नवीन जोडीदार रेडबर्डबरोबर महत्त्वपूर्ण संबंध स्थापित केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

राजस्थान रॉयल्सची आयपीएलमधील कामगिरी

राजस्थान रॉयल्सने २००८मध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकले होते. राजस्थानला २०२०च्या हंगामात चौदा सामन्यांमधून सहा विजयांसह आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदाच्या हंगामात त्यांनी सात सामन्यांपैकी तीन विजयांसह पाचवे स्थान पटकावले आहे.