05 April 2020

News Flash

ये देश हे शेर जवानोंका….,आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं अँथम ऐकलत का?

नेटीझन्सचाही नवीन अँथमला चांगला प्रतिसाद

प्रतिनिधिक छायाचित्र

आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, काल या नवीन हंगामासाठी अँथम साँगचं प्रसारित करण्यात आलं. यंदा आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे Star Sports या वाहिनीकडे आहेत. त्यामुळे क्रीडा प्रसारणात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या वाहिनीने यंदाच्या अँथममध्येही आपला वेगळेपणा जोपासला आहे. ये देश हे वीर जवानोंका या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाचं अँथम साँग रचण्यात आलेलं आहे.

हिंदी, तामिळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये हे गाणं प्रसिद्ध केलं जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा चित्रपट दिग्दर्शक डॅन मेस, संगीत दिग्दर्शक राजीव भल्ला, वोकलिस्ट सिद्धार्थ बसरुर यांनी या थीम साँगवर काम केलेलं आहे. या आयपीएल अँथम साँगच्या माध्यमातून भारतातील कोट्यवधी क्रीडा रसिक पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील असं वक्तव्य, बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2018 9:47 am

Web Title: ipl release its new anthem song for the season 11
टॅग IPL 2018
Next Stories
1 IPL 2018 – हिथ स्ट्रिक कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक
2 IPL 2018: उगवत्या सूर्याची झळाळी आणि बरंच काही, दिल्ली डेअरडेविल्सची नवी जर्सी पाहिली का?
3 माझा खेळ सुधारण्यात धोनीचा वाटा मोठा – केदार जाधव
Just Now!
X