14 August 2020

News Flash

१९ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम ! गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची माहिती

८ नोव्हेंबरला रंगणार अंतिम सामना

संग्रहित छायाचित्र

आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं समजतंय.

“१९ सप्टेंबर (शनिवारी) ला स्पर्धेला सुरुवात होईल तर ८ नोव्हेंबर (रविवार) ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे.” ब्रिजेश पटेल पीटीआयला ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला.

याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता. परंतु युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टरोजी संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:45 pm

Web Title: ipl set to start on september 19 final on november 8 teams to leave base by aug 20 say bcci sources psd 91
Next Stories
1 IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाची परवानगी, पण…
2 ५४ व्या वर्षी माईक टायसन करणार पुनरागमन
3 लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
Just Now!
X