02 March 2021

News Flash

IPL 2020 : २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची संघांना परवानगी – BCCI अधिकाऱ्यांची माहिती

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम

आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत गव्हर्निंग काऊन्सिनने रविवारी झालेल्या बैठकीत अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचं नक्की झालंय. अद्याप केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी येणं बाकी असलं तरीही येत्या काही दिवसांत ही परवानगी मिळेल अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. परंतू २० ऑगस्टआधी कोणताही संघ युएईला रवाना होणार नाही अशी माहिती बीसीसीआयने सर्व संघमालकांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ १० ते १२ ऑगस्ट दरम्यान युएईसाठी रवाना होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

“आयपीएलच गव्हर्निंग काऊन्सिलने आम्हाला इ-मेल करुन २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणताही संघ याआधी युएईला जाण्याचा प्रश्नच येत नाही. गव्हर्निंग काऊन्सिलचा नियम खूप स्पष्ट आहे.” आयपीएलच्या एका संघमालकाने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली. बीसीसीआयने सर्व संघांना खेळाडूंच्या व्हिसा प्रक्रियेसाठी तयारीला लागण्याची परवानगी दिली आहे. अद्याप खेळाडूंसाठीची मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आलेली नाहीत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पर्धेसाठी परवानगी दिली असली तरीही इतर विभागांकडून बीसीसीआयला अद्याप परवानगी मिळणं बाकी आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, हा मोठा बदल तुम्हाला माहिती आहे का??

यंदाच्या स्पर्धेत सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे. याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – #BoycottIPL…जाणून घ्या सोशल मीडियावर का होतोय आयपीएलला विरोध??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 10:36 am

Web Title: ipl teams can leave for uae after august 20 bcci to franchises psd 91
Next Stories
1 IPL 2020 चे सर्व सामने रात्री साडेसात वाजता, माजी भारतीय खेळाडू म्हणतो हाच निर्णय कायम ठेवा
2 IPL 2020 : इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, हा मोठा बदल तुम्हाला माहिती आहे का??
3 माजी रणजीपटूचा करोनाने घेतला बळी
Just Now!
X