ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक टेक्स्ट मेसेज करून करारातून मुक्त केले असल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ऑस्ट्रलियात पत्रकारांशी संवाद साधताना स्टार्कने ही माहिती दिली. स्टार्कला KKRने १.८ मिलियन डॉलर्स एवढी तगडी किंमत देऊन खरेदी केले होते. पण एका मेसेजच्या माध्यमातून मला करारातून मुक्त करण्यात आले असल्याची माहिती त्याने दिली.

 

संघाच्या मालकांकडून मला एक टेक्स्ट मेसेज आला. त्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता एप्रिल २०१९ मध्ये मी घरीच असणार आहे. गेल्या वर्षी तंदुरुस्तीचे कारणास्तव मला खेळता आले नव्हते. यावेळी जर मी खेळलो असतो, तर मला माझी तंदुरुस्ती सिद्ध करता आली असती. सध्या एक किरकोळ दुखापत वगळता मी तंदुरुस्त आहे. पण जत पुढच्या वर्षी मी IPLमध्ये खेळणार नसेन, तर इंग्लंडमध्ये मी सहा महिने क्रिकेट नक्कीच खेळू शकेन, असे तो म्हणाला.

सध्या मला ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून शक्य तेवढे कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. IPLमुळे मला आर्थिक फायदा होतो, हि गोष्ट खरी आहे. पण IPL आणि कसोटी क्रिकेट यात मी नेहमीच कसोटीला प्राधान्य देईन असेही त्याने स्पष्ट केले.