03 April 2020

News Flash

IPL 2019 : Gabbar is Back! शिखर धवन पुन्हा दिल्लीकर

३ खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनची ‘घर’वापसी

IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार आहे. ३१ ऑक्टोबरला याबाबतची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. मात्र आज या वृत्ताला आज अधिकृत दुजोरा मिळाला. त्यामुळे आधी हैदराबाद संघाकडून खेळणारा शिखर धवन आता दिल्ली संघाकडून खेळणार आहे.

शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली आहे. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात दिल्ली डेअरडेव्हिल्सने अधिकृत ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिखर धवन हा पुन्हा दिल्लीच्या संघाकडून आयपीएलचे सामने खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २००८ साली शिखर धवनने दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा IPLमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा प्रवास मुंबईइंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असा झाला. धवनने आतापर्यंत १४३ आयपीएल सामने खेळले असून त्यात ३३.२६ च्या सरासरीने आणि १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४०५८ धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 6:14 pm

Web Title: ipl2019 shikhar dhawan back to delhi daredevils
टॅग Ipl,Shikhar Dhawan
Next Stories
1 IND vs WI : …आणि तो थ्रो पाहून रोहितने मारून घेतला डोक्यावर हात
2 ‘विराट’ विक्रमानंतर बाबर आझम म्हणतो, कोहलीच माझा आदर्श !
3 पाकिस्तनाच्या बाबर आझमने मोडला विराटचा विक्रम
Just Now!
X