23 September 2020

News Flash

टेनिस लीगच्या तिकिटांसाठी चाहत्यांची ऑनलाइन झुंबड

आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील दिग्गजांचा पाहण्याची संधी देणाऱ्या महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग(आयपीटीएल)च्या भारतातील पहिल्या टप्प्याची तिकिटे २० मिनिटांत संपली. 'बुक माय शो' या संकेतस्थळावर

| November 1, 2014 03:59 am

आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील दिग्गजांचा पाहण्याची संधी देणाऱ्या महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग(आयपीटीएल)च्या भारतातील पहिल्या टप्प्याची तिकिटे २० मिनिटांत संपली. ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर ही तिकीटे उपलब्ध होताच व्हच्युर्अल चाहत्यांची झुंबड उडाली आणि अवघ्या काही वेळात तिकिटे संपल्याची पाटी संकेतस्थळावर झळकली. ‘‘टेनिसरसिकांच्या प्रतिसादाने आम्ही भारावलो आहोत. जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंचा खेळ भारतीय टेनिसरसिकांना पाहता, यावा हेच आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे इंडियन ऐसेस संघाच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘‘तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा सोमवारी, ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. देशात पहिल्यांदाच टेनिस पाहण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. हा प्रतिसाद अपवादात्मक असा आहे,’’ असे उद्गार महेश भूपतीने काढले. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत दिल्लीतील इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमध्ये ही टेनिसमैफल रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 3:59 am

Web Title: iptl tickets go on sale from friday
टॅग Iptl
Next Stories
1 अजय देवगण दिल्ली ड्रीम्स टेनिस संघाचा सहमालक
2 पंकज विश्वविजेता
3 रोहितची शतकी गर्जना!
Just Now!
X