20 September 2020

News Flash

विरोध झुगारुन लावत इराणने कुस्तीपटूला फासावर लटकवले

२७ वर्षीय कुस्तीपटूची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केलेला प्रयत्न

फोटो सौजन्य : एएफपी

इराणमधील प्रसिद्ध कुस्तीपटू नाविद अफकारी याला शनिवारी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. इराणमधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या आयआरएनए या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सीएननने हे वृत्त दिलं आहे. आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ नये असा नावीदचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

२७ वर्षीय नाविदला शिराज येथील तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं.  इराणमधील सरकारी पाणी आणि मलनिस्सारण विभागाचा सुरक्षा अधिकारी हसन तुर्कमन याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली नाविदला शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१८ साली शिराज शहरातील हिंसेमध्ये हसनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात नाविदला अटक करण्यात आली होती असं मीझान या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नाविदला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याच्या वृत्ताने धक्का बसल्याचे म्हटले आहे. “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बेच यांनी इराणमधील सर्वोच्च नेते आणि इराणच्या अध्यक्षांना मागील आठवड्यामध्ये नाविदची शिक्षा माफ करावी अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं,” असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. “इराणची एनओसी, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि नॅशनल इराण कुस्ती महासंघ यांच्यासह एकत्रित कामांची आणि आमच्या विनंतीनंतरही नाविदला वाचवण्याचं ध्येय साध्य करण्यात अपयश आलं हे खिन्न करणारं आहे,” असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटलं आहे.

इराणच्या न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्ते घोहलाम हुसैन इस्माईली यांनी यापूर्वीच या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल करुन सुनावणी झाली होती. नाविदने आपला गुन्हा मान्य केला होता. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नाविदला माफ करण्यास आणि भरपाई देऊन शिक्षा कमी करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळेच शनिवारी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, असं आयआरएनएने म्हटलं आहे.

नाविदला देण्यात आलेल्या शिक्षेला जगभरातील वेगवेगळ्या क्रिडा संस्थांनी विरोध केला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नाविद दोषी ठरल्याने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. नाविदला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याबद्दल जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 10:26 am

Web Title: iran executes wrestler navid afkari scsg 91
Next Stories
1 श्रीशांतची बंदी संपुष्टात
2 टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला जेतेपद
3 महिला संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता!
Just Now!
X