जागतिक फुटबॉल क्रमवारीत उच्च क्रमवारीवर असलेल्या आशियातील इराणने २०१८ फिफा विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पध्रेत भारताला सहजगत्या हरवले. भारतीय संघाची खराब कामगिरी पुन्हा प्रत्ययास आली. आझादी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या सामन्यात इराणने भारतावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला.
इराणकडून हाजी साफी (३३व्या, ६६व्या मिनिटाला), अझमॉन (६१व्या) आणि अलीरेझा (७८व्या) यांनी गोल केले. या विजयासह इराणने ‘ड’ गटात सर्वाधिक १७ गुणांसह आघाडी मिळवली आहे. तर एकही विजय न मिळवणारा भारताचा संघ फक्त ३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. २९ मार्चला भारताचा सामना तुर्कमेनिस्तानशी होणार आहे.