विदर्भने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धा जिंकली. त्यानंतर आजपासून विदर्भ आणि शेष भारत यांच्यात इराणी ट्रॉफीची लढत सुरू झाली आहे. या सामन्यात विदर्भकडे प्रतिभावान आणि अनुभवी खेळाडूंची फौज आहे. त्यातच एक महत्वाचा खेळाडू म्हणजे वासिम जाफर. ‘ओल्ड इज गोल्ड’ या म्हणीप्रमाणे त्याची क्रिकेट कारकीर्द सुरु आहे. मात्र इराणी ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला आठवत आहे ती वासिमने गेल्या वर्षीच्या इराणी ट्रॉफीमध्ये केलेले द्विशतक.
२०१८ साली झालेल्या इराणी ट्रॉफीमध्ये विदर्भ विरुद्ध शेष भारत असा सामना रंगला होता. हा सामना अनिर्णित राहिला खरा. पण या सामन्यात व्यष्टी चाळीशी ओलांडलेल्या विदर्भच्या वासिम जाफरने द्विशतक ठोकले होते. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात वसीम जाफरने २८६ धावांची केली साकारली होती. तडाखेबाज खेळीच्या जोरावर त्याने हे द्विशतक झळकावले होते. ३४ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने ४३१ चेंडूत ही खेळी सजवली होती.
दरम्यान, वासिमच्या द्विशतकाच्या जोरावर विदर्भने प्रथम फलंदाजी करत ८०० धावांचा डोंगर उभारला होता. २२६ षटके खेळून विदर्भने ७ बाद ८०० धावांवर डाव घोषित केला होता. यात जाफर व्यतिरिक्त अपूर्व वानखडेचे दीडशतक (१५७) आणि गणेश सतीशचे शतक (१२०) याचा समावेश होता.यास प्रत्युत्तर म्हणून शेष भारतच संघ करून नायरच्या नेतृत्वाखाली पहिल्या डावात ३९० धावाच करू शकला होता. तर सामना संपेपर्यंत विदर्भने दुसऱ्या डावात बिनबाद ७९ धावा केल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 11:23 am