सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावणारा विदर्भ संघ सध्या इराणी चषकात शेष भारताविरुद्ध खेळतो आहे. या सामन्यात विदर्भाचा फिरकीपटू अक्षय कर्णेवारने उपस्थित सर्वांना बुचकळ्यात पाडलं. काही क्षणांपर्यंत डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अक्षयने आपण उजव्या हाताने गोलंदाजी करणार असल्याचं पंचांना कळवलं. हे ऐकल्यानंतर पंच नंदन यांनाही विश्वास बसला नाही, यासाठी त्यांनी अक्षयच्या जवळ जाऊन चर्चा केल्यानंतर तो डाव्याऐवजी उजव्या हाताने फलंदाजी करणार असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या ‘दुहेरी’ गोलंदाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
शेष भारताचा संघ पहिल्या डावात 330 धावांपर्यंत मजल मारु शकला. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि तिसऱ्या स्थानावर हनुमा विहारी यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. अक्षय कर्णेवारने पहिल्या डावात 15 षटकं फेकली, यामध्ये त्याने 3 षटकं निर्धाव टाकत 50 धावा देत 1 बळी घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 13, 2019 12:00 pm