News Flash

आर्यलडकडून ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या विंडीजला पराभवाचा धक्का

दिग्गज संघांना पराभूत करण्याची किमया साधणाऱ्या आर्यलडच्या यादीत आणखी एका विजयाची भर पडली आहे. जमैकाच्या सबिना पार्कवर झालेल्या पहिल्या

| February 21, 2014 12:10 pm

दिग्गज संघांना पराभूत करण्याची किमया साधणाऱ्या आर्यलडच्या यादीत आणखी एका विजयाची भर पडली आहे. जमैकाच्या सबिना पार्कवर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आर्यलडने ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा सहा विकेट राखून पराभव
केला. २००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत किंग्स्टनच्या याच मैदानावर आर्यलडने पाकिस्तानवर नाटय़मय विजयाची नोंद केली होती. विंडीजने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु आर्यलडने यजमानांना २० षटकांत ८ बाद ११६ धावसंख्येवर सीमित राखले. त्यानंतर आर्यलडने ५ चेंडू शिल्लक असतानाच हे आव्हान पादाक्रांत केले. एड जॉयसेने ४० आणि अ‍ॅन्ड्रय़ू पॉइंटरने ३२ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 12:10 pm

Web Title: ireland and ed joyce shock world twenty20 champions west indies
टॅग : Sport
Next Stories
1 दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून धोनीची माघार
2 झहीरने भविष्याचा विचार करावा – द्रविड
3 हरून.. हरून ..हरून.. तरी धोका नाही!
Just Now!
X