28 September 2020

News Flash

अटीतटीच्या लढतीत आयर्लंडचा इंग्लंडवर धडाकेबाज विजय

१ चेंडू राखून जिंकला सामना

ICCच्या वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेत आयर्लंडने आपले गुणांचे खाते उघडले. पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दोघांच्या शतकांच्या बळावर आयर्लंडने ४९.५ षटकात हे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर लीगमध्ये १० गुणांची कमाई केली.

आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण नंतर इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी केली. त्याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. त्याला चॉम बँटन चांगली साथ देत अर्धशतक (५८) झळकावले. तळाचे फलंदाज डेव्हिड विली (५१) आणि टॉम करन (नाबाद ३८) यांनीही चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंडने ५० षटकात ३२८ धावांपर्यंत मजल मारली.

३२९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा पहिला बळी लवकर बाद झाला. पण नंतर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी यांनी २१४ धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४२ धावा केल्या. तर बल्बर्नीने ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत केविन ओब्रायनच्या निर्णायक फटकेबाजीच्या (१५ चेंडूत नाबाद २१) जोरावर आयर्लंडने ७ गडी आणि १ चेंडू राखून सामना जिंकला.

पॉल स्टर्लिंगला सामनावीर तर डेव्हिड विलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 9:00 am

Web Title: ireland beat england in high scoring odi to open account in icc mens cricket world cup super league vjb 91
Next Stories
1 क्रीडा साहित्य विक्री उद्योगाला करोनाचा फटका!
2 फुटबॉलपटू कॅसियासची निवृत्ती
3 राज्यस्तरीय खेलो इंडियाचे आयोजन करा – रिजिजू
Just Now!
X