News Flash

फेडरेशन चषक कॅरम स्पर्धा : इर्शाद आणि अपूर्वा अजिंक्य

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत माजी विश्वविजेत्या अपूर्वाने अपेक्षेप्रमाणे ऐशावर १०-२५, २५-२२, २५-६ अशी मात करून जेतेपदावर नाव कोरले.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताच्या इर्शाद अहमद आणि एस. अपूर्वा यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटात अजिंक्यपद मिळवले. भारताच्याच प्रशांत मोरे आणि ऐशा खोकावाला यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर राजेश गोहिल आणि रश्मी कुमारी यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

१६ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या इर्शादने मुंबईच्या प्रशांतला ३-२५, २५-१४, २५-२४ असे तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत केले. इर्शादचे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलेच विजेतेपद ठरले. त्यापूर्वी, सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत इर्शादने स्विस लीग विजेत्या झहीर पाशावर

२५-१४, १८-२५, २५-२३ असा विजय मिळवला, तर प्रशांतने राजेशवर २५-२४, ६-२५, २५-२१ अशी सरशी साधून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत माजी विश्वविजेत्या अपूर्वाने अपेक्षेप्रमाणे ऐशावर १०-२५, २५-२२, २५-६ अशी मात करून जेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात पहिला सेट जिंकणाऱ्या ऐशाने दुसऱ्या सेटमध्येही एक वेळ २२-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर अनुभवी अपूर्वाने झोकात पुनरागमन करून विजयश्री मिळवली.

महिला एकेरी विजेती एस. अपूर्वा (डावीकडे) आणि  पुरुष एकेरी विजेता इर्शाद अहमद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 2:02 am

Web Title: irshad and apurva win federation cup carrom tournament abn 97
Next Stories
1 आत्मपरीक्षणाची गरज!
2 सलामीवीराची एक धाव, इतर ९ फलंदाज शून्यावर माघारी, जाणून घ्या या अनोख्या सामन्याबद्दल…
3 IND vs WI : विराटच्या आक्रमक खेळीवर कर्णधार पोलार्डची प्रतिक्रीया, म्हणाला…
Just Now!
X