धोनीची आमच्या संघात खेळण्याची पात्रता नाही. तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. पण, धोनीन जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारत असेल, तर आम्ही त्याला न्यूझीलंड संघात येण्यासाठी विचारू, असे गौरवोद्गार विलमसनने सामन्यानंतर काढले आहेत. उपांत्या सामन्यात भारतावर न्यूझीलंड संघाने १८ धावांनी विजय मिळवला आहे.

मोक्याच्या क्षणी धोनीचं धावबाद होणं सामन्याचा टर्निंग पाईंट असल्याची प्रतिक्रियाही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने सामन्यानंतर दिली आहे. जाडेजा आणि धोनीने सामन्याचे चित्र बदलले होते. दोघांनी केलेल्या भागिदारीमुळे भारत विजयाच्या जवळ पोहचला होता. मात्र, जाडेजा आणि त्यानंतर धोनी बाद झाल्यामुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला.

सामन्यानंतर केन बोलत होता. तो म्हणाला, उपांत्य फेरीचा रंगतदार झाला. दोन दिवस रंगलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीचा निकाल आमच्या बाजूने लागला याचा याचा आनंद खूप मोठा आहे. पावसामुळे सगळेच कठीण होते; पण आम्हाला परिस्थितीचा अंदाज अचूक आला.

भारताप्रमाणे आम्हालाही असे वाटले होते की लढतीत धावांची बरसात होईल. पण पावसामुळे २४० धावा करणेही आम्हाला कठीण झाले होते. त्यामुळे आम्हाला खात्री होती की भारताचे आघाडीचे तीन फलंदाज बाद केल्यास दडपण निर्माण करता येईल. आघाडीच्या तीन फलंदाजाना बाद केले आणि आम्ही अर्धी लढाई जिंकली. सामन्यापूर्वी केलेल्या प्लॅनिंगनुसार आमच्या गोलंदाजांनी नेटकी गोलंदाजी केली. जाडेजा आणि धोनीची फटकेबाजी आणि जमलेली भट्टी पाहून धडकी भरली होती; पण त्या स्थितीतही आमच्या क्षेत्ररक्षकांनी लढतीचे पारडे न्यूझीलंडच्या बाजूने झुकवले. उपांत्य फेरीत आम्हाला कुणीच फेव्हरिट समजत नव्हते. उपांत्य फेरीत आलेल्या संघांनी आम्हाला नमवले होते.

भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताचे सर्व दिग्गज फलंदाज आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळले. अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या.  या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.