23 September 2020

News Flash

बेशिस्त वर्तनाबद्दल इशांत शर्माला दंड

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर बेशिस्त वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंडात्मक कारवाई केली आहे.

| December 22, 2014 04:02 am

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर बेशिस्त वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंडात्मक कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला बाद केल्यानंतर अपशब्द उच्चारल्याबद्दल इशांतच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कपात केली जाणार आहे, अशी माहिती आयसीसीने एका पत्रकाद्वारे दिली.
गाबा येथे झालेल्या कसोटीतील पहिल्या डावात स्मिथला बाद केल्यानंतर शर्माने त्याच्याकडे कटाक्ष टाकीत अपशब्द उच्चारले असल्याचा अहवाल सामनाधिकारी जेफ क्रो यांनी आयसीसीकडे पाठवला होता. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने कमी वेगाने षटके टाकल्याबद्दल स्मिथ याच्यावरही दंडात्मक कारवाई झाली आहे. त्याच्या मानधनातून ६० टक्के रक्कम कपात करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 4:02 am

Web Title: ishant sharma fined for breaching code of conduct
Next Stories
1 मुंबईच्या दोन्ही संघांची बाद फेरीकडे वाटचाल
2 सरपंचांना मारहाण; खेळाडूवर एक वर्षांची बंदी
3 महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
Just Now!
X