भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. पहिल्या सामन्यात पराभूत होऊनही भारताने जोरदार पुनरागमन केले आणि मालिका खिशात घातली. या मालिकेत दोनही डावात अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर झाला असल्याची चर्चा असतानाच आता भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला न्यूझीलंड मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

सचिनने कांबळीला दिलं चॅलेंज; म्हणाला “आठवड्याभरात ‘हे’ करूनच दाखव”

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. त्यानंतर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेतील कसोटी मालिकेसाठी इशांत शर्माला स्थान देण्यात आले होते. पण दिल्लीच्या रणजी संघाकडून खेळताना इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला.

भारताला जबर धक्का; ‘इन-फॉर्म’ फलंदाज न्यूझीलंड दौऱ्यातून OUT

 

U-19 World Cup 2020 : भारत अवघ्या २९ चेंडूत ‘यशस्वी’; उडवला जपानचा धुव्वा

विदर्भ विरूद्धच्या सामन्यात सोमवारी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. विदर्भचा कर्णधार फैझ फजल याला बाद ठरवण्यासाठी इशांत शर्मा अपील करत होता, त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. इशांतची दुखापत ही तिसऱ्या श्रेणीची म्हणजेच गंभीर स्वरूपाची आहे. त्याला किमान सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

इशांतआधी शिखर धवनही दौऱ्यातून बाहेर

न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला आता दौऱ्यातून माघार घ्यावी लागली असल्याचे वृत्त आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. मात्र शिखर धवनच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.