भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यंदाच्या हंगामात दिल्ली रणजी संघाचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीच्या निवड समितीने यंदा गौतम गंभीरला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं करण्याचा निर्णय घेत संघात काही नवीन आणि तरुण खेळाडूंना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

“गौतम गंभीरवर कर्णधारपदाचा भार न देता त्याने अधिकाधिक धावा कराव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे. इशांत शर्माकडे कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसला तरीही गौतम गंभीर त्याच्या मदतीला असल्याने संघात फारश्या समस्या निर्माण होणार नाहीत.” दिल्ली निवड समितीचे प्रमुख अतुल वासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

याव्यतिरीक्त ऋषभ पंत याच्याकडे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर उन्मुक्त चंद दिल्लीचा सलामीवीर म्हणून यंदाच्या हंगामातही खेळणार आहे. याचसोबत १९ वर्षाखालील संघातील काही खेळाडूंनाही संघात जागा देण्यात आला आहे.

असा असेल दिल्लीचा रणजी संघ –
इशांत शर्मा (कर्णधार), गौतम गंभीर, उन्मुक्त चंद, नितीश राणा, ध्रुव शौरी, मिलींद कुमार, हिम्मत सिंह, कुणाल चंदेला, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनन शर्मा, विकास मिश्रा, पुलकीत नारंग, नवदीप सैनी, विकास टोकस, कुलवंत खजोरीया.